१६ ऑक्टोबर २०१९
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एकूण ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. जाहीरनाम्यात न्यायासह, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आमच्या ‘मन की बात’ नसून जनतेच्या ‘मन की बात’ असल्याचे म्हणत राहुल यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ची खिल्ली उडवली.पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल पुढे म्हणाले, ‘देशात सर्वच हिंदू आहेत, मात्र देशाला सर्वाधिक गरज आहे ती रोजगाराची. देशाला शेतकऱ्यांची गरज आहे. देशाला न्यायाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेची गरज आहे, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे.’
काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात?
> देशातील गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये जमा केले जातील.
> या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार.
> नोटबंदीमुळे खिळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला प्रवाहित करणार.
> जीएसटीत योग्य बदल करून ती करप्राणाली सुटसुटीत आणि सोपी करण्यात येईल.
> सत्तेत आल्यास सहा महिन्यांमध्ये २२ लाख नोकऱ्या निर्माण करणार.
> शिक्षणक्षेत्रावर जीडीपीच्या ६ टक्के पैसा खर्च करणार.
> शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करणार.
> शेतकऱ्याना कर्ज फेडता न आल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, तर तो केवळ दिवाणी स्वरुपाचा असेल.
> गरिबातील गरीब व्यक्तीला उत्तम आरोग्य सेवा पुरवणार.
> मनरेगा योजना कार्यान्वित करून १०० दिवसांऐवजी १५० दिवस रोजगार देण्याची हमी देणार.
> १० लाख युवकांना ग्रामपंचायत क्षेत्रात रोजगार देणार.
> देशातील युवकांना ३ वर्षांपर्यंत व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणचाही परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल.
> काँग्रेस पक्ष देश जोडण्याचे काम करेल.
> आमचा भर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धोरणे आखण्यावर राहील.
> काँग्रेसची सत्ता आल्यास सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्यात (एएफएसपीए) बदल करणार.