गुरुवार आज रोजी संध्याकाळी एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असून त्या अनुषंगाने घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने पंतप्रधानांना रिंग रोड बधितांच्या वतीने निवेदन बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या अडीच वर्षांपासून घर बचाव संघर्ष समिती हक्काच्या घरांनासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आहे.गुरुद्वारा परिसर,वाल्हेकरवाडी,बिजलीनगर,चिंचवडेनगर,थेरगाव,रहाटणी,पिंपळे गुरव,कासारवाडी या उपनगरातील ३५०० (साडे तीन हजार) घरे नियोजित मंजुरी नसलेल्या एचसीएमटीआर प्रकल्पामुळे बाधित होत आहेत.पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत २८ किमी व पुणे महापालिका हद्दीत ३६ किमी चा सदरचा एचसीएमटीआर रस्ता नियोजित आहे. दोनही महापालिका हद्दीतील नियोजित प्रकल्पाकरिता ६००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या संदर्भात घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन प्रसिद्ध झाले आहे.पंतप्रधानांनी याबाबत लक्ष घालावे असे समितीचे मत आहे. या करिता समितीचे विजय पाटील यांनी बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले.त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभाग सतर्क झाले.त्याचीच परिणीती म्हणून आज सकाळी समितीचे विजय पाटील यांना चिंचवड पोलिसांनी राहत्या घरातून त्याब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांचे आदेशानुसार विजय पाटील चिंचवड पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. त्यांचे सोबत घर बचाव चे कार्यकर्ते ही आहेत.
पंतप्रधानाच्या सभेला विरोध होऊ नये म्हणून घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील पोलिसांच्या ताब्यात.
RELATED ARTICLES