१८ ऑक्टोबर २०१९
निगडी उपटपाल कार्यालयात सकाळी बहुतांश ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याने त्याचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत आहे.तसेच दुपारनंतर अनेकदा जेवणाची सुट्टीची वेळ संपूनही नागरिकांना ताटकळत थांबवण्यात येते.
परिणामी दुपारनंतर या कार्यालयात गेल्यास येथील काम संथगतीने सुरु असते.
सध्या कार्यालयात ३१ कर्मचारी आहेत. येथील अडचणींबाबत टपाल खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. दुपारनंतर मात्र एकच खिडकी सुरु असल्याने इतर वेगळ्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात सर्व्हर डाउन झाल्याने अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. तरीसुद्धा याकडे टपाल खात्याचे दुर्लक्ष होत आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी मांडली .
निगडी टपाल कार्यालय सुविधा देण्यास असक्षम – कामाचा खोळंबा नागरिकांची गैरसोय
RELATED ARTICLES