९ नोव्हेंबर
अयोध्यातील ऐतिहासिक रामजन्मभूमी – बाबरी मशीद
जमीनवादा हा गेली १३४ वर्षापासून चालू आहे. या जागेसंदर्भातील निकाल आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठमध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या.धनंजय चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. नजीर ह्या पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.
या निकालाचे वाचन सुरुवातीला सारांशत्मक टिप्पण वाचून दाखविल्यानंतर न्यायालयामार्फत संपुर्ण निकालाचे सविस्तर वाचन केले जाईल. याला साधारणत: अर्धा ते एक तास लागू शकतो.
दरम्यान हा निकाल धार्मिक बाबतीत असल्यामुळे खुप संवेदनशील निकाल आहे त्यामुळे देश केंद्र सरकारने चोख
सुरक्षा व्यवस्था ठेवली असून सर्व जनतेला शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणीही सोशल मिडीया वरुन कसलेही संदेश पाठवू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संदेश दिला आहे .
अयोध्येसंदर्भात सर्वोच न्यायालयाचा निकाल हा कुणाचाही
विजय अथवा पराजय नाही. या निर्णायनंतर शांतता, ऐक्य आणी सद्वभावनेच्या महान पंरपरेला आणखी दृढ करण्यास आपले प्राधान्य असले पाहीजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूज १४ च्या वतीनेही आपणांस आवाहन करण्यात येते की
या निकालाचे सर्वांनी स्वागत करुन देशाच्या सर्वोच न्यायालायाच्या निर्णायाचे पालन करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवतां शांतता राखावी.