Friday, September 29, 2023
Homeउद्योगजगतनाविन्यपुर्ण व्यवसाय (स्टार्ट अप्स) करू पाहणार्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मदतीचा हात

नाविन्यपुर्ण व्यवसाय (स्टार्ट अप्स) करू पाहणार्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मदतीचा हात

६ नोव्हेंबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस’तर्फे नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांकडून (स्टार्ट अप्स) प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. यामध्ये निवड होणाऱ्या व्यवसायांना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राकडून मार्गदर्शन व पाठबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.इच्छुकांच्या अर्जांची तज्ज्ञांमार्फत निवड केली जाईल. निवडलेल्या व्यवसायांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यात ‘मेन्टॉर’ उपलब्ध करून देणे, मार्केटिंग,कायदेशीर व आर्थिक बाबींचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. याशिवाय जागा उपलपब्ध करून देणे,’स्टार्ट अप्स’चे प्रशिक्षण,बीज-भांडवलासंबंधी मदत या गोष्टींही पुरवल्या जाणार आहेत.
विद्यापीठाच्या ‘इन्क्युबेशन केंद्रा’त सध्या ११ ‘स्टार्ट अप’ कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नाविन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी काही गेल्या सहा महिन्यांत उभी राहिली आहेत. या केंद्राला ‘महाराष्ट्र स्टेट इन्क्युबेशन सोसायटी फॉर इन्क्युबेशन सेंटर’तर्फे अनुदानही मिळाले आहे. या केंद्राने टीआयई, केपीआयटी, पुणे स्मार्ट सिटी एसपीयू अशा विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले असून, त्यांच्याकडून ‘स्टार्ट अप्स’साठी आवश्यक पाठिंबाही मिळवला आहे. ‘नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या युवकांना त्यांचा व्यवसाय मोठा करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक आहे. इनक्युबेशन केंद्रातर्फे विद्यापीठ स्टार्ट अप्सना असे पाठबळ मिळवून देऊ इच्छिते,’ असे विद्यापीठाच्या ‘इन्क्युबेशन सेंटर’च्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.
३० नोव्हेंबर २०१९ पूर्वी किंवा त्या दिवसापर्यंत प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन विद्यापीठाच्या इनोव्हेशन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. यापैकी निवड झालेले प्रस्तावांचे उद्योग, गुंतवणूक व स्टार्ट अप क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल. अधिक माहितीसाठी http://iil.unipune.ac.in ही लिंक पाहावी. इलेक्ट्रिकल मोबिलिटी, बिग डेटा, एन्व्हायर्न्मेंट टेक्नॉलॉजी, सामाजिक उद्योजकता या क्षेत्रात स्टार्ट अप निर्माण करण्यावर विद्यापीठाचा भर आहे. त्याद्वारे तरुण रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे व्हावेत, असा आमचा मानस आहे,

– प्रा. डॉ. नितीन करमळकर,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments