५ नोव्हेंबर
देशात सर्वांत व्यग्र असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घाटकोपर-विलेपार्ले असलेल्या मुख्य धावपट्टीची मोठी दुरुस्ती सोमवारपासून सुरू झाली. ही दुरुस्ती सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे पाचदरम्यान करण्यात आली. एकीकडे दिल्लीतील प्रदूषणाचा तेथील विमानसेवांवर परिणाम झाल्याने एकच विमान दिवसभर विविध मार्गांवर फिरविणाऱ्या कमी तिकीट दरातील कंपन्यांची देशभरातील उड्डाणे विलंबाने उडत आहेत. त्यात मुंबईच्या विमानतळावरील या दुरुस्ती कामांमुळे अनेक कंपन्यांच्या विमानसेवांना दुहेरी विलंबाचा फटका बसला आहे.
विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, ‘मुंबईच्या विमानतळावरून तासाला ४५ ते ४८ तर दिवसभरात साधारण ९०० विमानांची ये-जा होते. तासाला साधरण २२ ते २४ विमाने आकाशात झेपावतात. सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे पाचदरम्यान जवळपास २२२ विमाने येथून रवाना होतात. मुख्य धावपट्टी बंद असल्याने या विमानांची उड्डाणे पर्यायी धावपट्टीवर वळविण्यात आली आहेत. यामुळेच सर्व कंपन्यांच्या मिळून २४ विमानसेवा धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत स्थगित झाल्या आहेत. हा आकडा पुढे आणखीही वाढण्याची शक्यता आहे.
धावपट्टीच्या दुरुस्तीचे हे काम २८ मार्चपर्यंत रविवारवगळता सोमवार ते शनिवार होणार आहे. याखेरीज २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही होणार नाही. एकूण १०२ दिवस हे काम चालणार आहे.
धावपट्टी दुरुस्तीच्या कामामुळे पहिल्याच दिवशी २४ विमाने रद्द
RELATED ARTICLES