प्रांजल पाटील या महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील येथील रहिवासी असून त्या केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. सोमवारी तिरुवनंतपुरम येथे के. गोपालकृष्णन आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपजिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली.
२०१७ च्या नागरी सेवा परीक्षेत (यु पी एस सी) १२४ वे स्थान पटकावल्यानंतर २०१८ मध्ये प्रांजल पाटील यांची केरळ येथे सहायक जिल्हाधिकारीपदावर नेमणूक करण्यात आली होती. प्रांजल पाटील यांची दृष्टी वयाच्या सहाव्या वर्षी पूर्णपणे गेली. आयुष्यात काहीतरी करायचंय असा दृढनिश्चय करून त्यांनी जिद्ध सोडली नाही. प्रांजल पाटील यांनी मुंबईच्या दादर येथील श्रीमती कमला मेहता शाळेतून शिक्षण घेतलं आहे. या शाळेत ब्रेललिपीत शिकविले जाते. पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी चंदाबाई कॉलेज मध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
“कधीही हार मनू नका आणि कधीही स्वतःला पराभूत समझू नका कारण आपल्या प्रयत्नांनी ती किमान एक संधी आपल्याला मिळणारच असते जीची आपण वाट बघत असतो. त्या संधीचे आपण काय करत असतो हे महत्वाचे असते. मला हे [पॅड स्वीकारताना आंनदही आहे आणि अभिमानसुद्धा आहे.”-प्रांजल पाटील
देशातील पहिली दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी – प्रांजल पाटील
RELATED ARTICLES