Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीदिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा - आ. सुनिल शेळके

दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – आ. सुनिल शेळके

3 डिसेंबर,
दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन मिळवून द्यायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी शासनामार्फत सहकार्य केले पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.

कर्तव्य व सेवाभावनेतुन त्यांच्याकडे समाजातील प्रत्येकाने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. आज विश्व दिव्यांग दिनानिमीत्ताने आ. शेळके यांनी दिव्यांगांसोबत कार्ला येथे केक कापून दिव्यांग दिन साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जि. प. सदस्य बाबुराव आप्पा वारकर, मा. प. समितीचे सदस्य दिपक हुलावळे, रा. कॉ युवक अध्यक्ष सचिनभाऊ घोटकुले, रा. कॉ. सरचिटणीस सुदाम कदम, रा. कॉ. लोणावळा शहर अध्यक्ष जीवन गायकवाड. राजु देवकर मा.सरपंच दिव्यांग बांधव उपस्थित होते.दरम्यान, आमदार सुनिल शेळके यांनी दिव्यांग व्यक्तींना सर्वपरीने सहकार्य करून सक्षम करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments