२३ ऑक्टोबर
धनत्रयोदशीचा मुहूर्त दिवाळीच्या आधीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक चांगली गोड बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीने दिली आहे.
दिवाळीच्या सणांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासाठी अनेक जण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दरात ३० रुपयांनी घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. यापूर्वी सोन्याचा दर ३८,९८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी झाली आहे. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीचे तपन पटेल यांनी दिली.
दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर
RELATED ARTICLES