२६ फेब्रुवारी २०२०
काँग्रेस पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा व दिल्लीचे मुख्यमंत्री यांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दिल्लीत शांतता राखण्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीही अयशस्वी ठरले असून त्यांनी जबाबदारी न घेतल्यानेच दिल्लीत अशी स्थिती झाल्याचेत्या यावेळेस बोलत होत्या.
दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या उकसवून लावणाऱ्या वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली.
– अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते ?
– ७२ तासात केंद्राने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही.
– दिल्लीतील हिंसाचार चिंतेचा विषय
– दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित कट
– कुठलीही कारवाई न केल्यामुळे २० लोकांचा मृत्यू
– भाजपा नेत्याच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार
– हिंसाचार वाढल्यानंतर निमलष्करी दलांना का पाचारण केले नाही.
– अतिरिक्त सुरक्षा पथके तात्काळ तैनात करा.
– प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात करा.
असं सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदत बोलताना त्या म्हणाल्या.