पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये घेतल्या जाणा-या दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा येत्या 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा येत्या 3 मार्च पासून घेतली जाणार आहे,असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
राज्य मंडळातर्फे पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिध्द केले जाते.त्यानुसार 15 आॅक्टोबर रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात आल्या असून बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु हाेणार
RELATED ARTICLES