Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीत्याला बोटं नसतानाही तो चित्र काढतो, चित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस.

त्याला बोटं नसतानाही तो चित्र काढतो, चित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस.

२०आॅक्टोबर २०१९,
दिनांक १६ आॅक्टोबर पासून चालू असलेल्या या चित्रकला प्रदर्शनाचा शेवटचा आज दिवस असून ,गेल्या तीन दिवसांत भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
या अनोख्या प्रदर्शनातील विक्रीच्या रकमेतुन, या मुलाला जगण्यासाठी व्यवसायाचं काही साधन देण्याच्या सोहम ट्रस्ट चा हा प्रयत्न आहे.
या चित्रकला प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस असून
मा. आदरणीय श्री.ज्ञानेश्वर मोळक (Joint Commissioner Pune Municiple Corporation ) व सौ. शैलजाताई मोळक तसेच श्री. अजितकाका गाडगीळ यांचे शुभहस्ते समारोप होणार अाहे.
या वेळी जगप्रसिद्ध चित्रकार श्री.चिंतामणी हसबनीस हे उपस्थित राहणार अाहेत, त्यांची चित्राची शैली म्हणजे ते अंध व्यक्तींनाही चित्रं “पहायला” लावतात.
हे प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून आज रात्री 9 पर्यंत सर्वासाठी खुले राहील, दरम्यान सायंकाळी 6 वाजता वरिल सर्व मान्यवरांच्या मनोगतांचा कार्यक्रम होणार असून , यावेळी एका चित्रकाराला प्रत्यक्ष चित्र काढताना तुम्हांला पाहावयास मिळेल याचे वैशिष्टय म्हणजे हा चित्रकार मुलगा बोटं नसतांनाही चित्रं काढतो कशी..? याचा Live Demo ठेवला आहे.
तरी या कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांनी आवूर्जन उपस्थित रहावे , असे आवाहन डाॅ अभिजीत सोनवणे, डाॅक्टर्स फाॅर बेगर्स आणी सोहम ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे ठिकाण पु. ना. गाडगीळ अॕन्ड सन्स, वेस्टेन्ड माॕलशेजारी / रिलायन्स माॕलजवळ, औंध, पुणे. येथे असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी ९ पर्यंत खूले राहील .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments