Friday, September 20, 2024
Homeताजी बातमी'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात- संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात- संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

२० नोव्हेंबर
बहुचर्चित’तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. परंतु, याच ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ट्रेलरमधील काही दृश्यांवर आणि संवादांवर संभाजी ब्रिगेडनं खुलासा मागितला आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून आक्षेपार्ह प्रसंगांवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

-छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे ?
-चित्रपटाद्वारे रामदासांचे उदात्तीकरण केले गेले असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी.
-अभिनेत्री काजोल यांच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छत्रपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही
उपाधी परत जनमानसावरठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे हे सरळ सरळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.
-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून
छत्रपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

असे मुद्दे मांडत त्यांनी आक्षेप नोदंवला आहे. पत्रात नमूद केलेल्या या सर्व मुद्यांवर दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपट निर्मात्यांनी खुलासा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर चित्रपट तयार करायला हवेत, परंतु चित्रपटाच्या नावाखाली ऐतिहासिक प्रसंगाचे किंवा व्यक्तींचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी संभाजी ब्रिगेडकडून चित्रपटाच्या टीमला देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments