४ फेब्रुवारी २०२०
कर्नाटकमधील एनएम प्रतापने ई-कचऱ्याच्या मदतीने तब्बल 600 ड्रोन तयार केले आहे. ड्रोन वैज्ञानिक म्हणून त्याला नवी ओळख मिळालेली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जगभरातील अनेक देशामधून त्याला ड्रोन बनवण्याचे निमंत्रणही मिळाले आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी प्रतापला पहिल्यांदाच ड्रोनमुळे ओळख मिळाली. त्याने ड्रोन चालवण्यापासून ते ती खोलून रिपेअरिंग करण्यास सुरुवात केली. 16 वर्षाच्या वयात प्रतापने असे ड्रोन तयार केले जे उडवू शकतो आणि त्यातून फोटोही काढता येत होते. आश्चर्य म्हणजे हे ड्रोन त्याने कचऱ्यापासून तयार केले होते.
इंडिया टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रतापने एका अशा प्रोजेक्टवर काम केले आहे. ज्यामध्ये सीमा सुरक्षासाठी टेलीग्राफी, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ड्रोन बनवणे, विना पायलेटचे प्लेन, ऑटो पायलट ड्रोन इतर गोष्टींचा समावेश आहे.प्रतापने हॅकिंगच्या बचावासाठी क्रिप्टोग्राफीचेही काम केले.
कर्नाटकमध्ये पूर आला तेव्हा प्रतापने तयार केलेल्या ड्रोनची तेथील सरकारला मोठी मदत मिळाली होती. प्रतापला आता 87 देशातून निमंत्रण आले आहे. इंटरनॅशनल ड्रोन एक्सपो 2018 प्रतापला अलबर्ट आइंस्टाइन इनोवेशन गोल्ड मेडलने सन्मानितही करण्यात आले आहे.
सध्या प्रताप डीआरडीओच्या एका प्रोजेक्टवर काम करत असून प्रताप ड्रोन तयार करताना नेहमी कमीत कमी ई-कचरा निर्माण करतो. तुटलेले जुने ड्रोन, मोटर, कॅपसीटरसह इतर वस्तूंनी तो ड्रोन तयार करतो.