Monday, May 11, 2026
Homeताजी बातमीडॉ. अशोक कुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली २१ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन...

डॉ. अशोक कुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली २१ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आता भोसरीत

१९ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन काही कारणामुळे स्थगित करण्यात आले आहे. आता हे संमेलन २१ आणि २२ डिसेंबर रोजी भोसरी येथील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात येणार आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल यांची घोषणा केली.
पिंपळे गुरव येथील ‘बंधुता भवन’ मध्ये प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया यांच्याहस्ते संमेलनाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी प्रा.चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य सदाशिव कांबळे, हाजी अफजल शेख, मधुश्री ओव्हाळ, शंकर आधथरे, महेंद्र भारती , प्रकाश जवळकर, संगीत झिंजुरके, प्रा. प्रशांत रोकडे आणि विश्वास रानवडे उपस्थित होते. बंधुता साहित्य संमेलनाने आपले वेगळेपण नेहमीच जपले असून सांस्कृतिक चळवळी मध्ये बंधुतेचे एक वेगळे दालनच निर्माण केले. नियोजित २१ वे साहित्य संमेलनही विचारांच्या पातळीवर आपलॆ महत्त्व अबाधित ठेवून मूल्यविचारचे बीजारोपण करेल असा विश्वास डॉ. पगारिया यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments