Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीटॅक्सीचालकाचा मुलगा झाला अंडर- १९ वर्ल्ड कप टीमचा कर्णधार

टॅक्सीचालकाचा मुलगा झाला अंडर- १९ वर्ल्ड कप टीमचा कर्णधार

३ डिसेंबर,
दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा झाली. या संघाचं नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाहू करणार आहेत. मेरठचा प्रियम गर्ग या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही.

प्रियमने स्वत:च्या मेहनतीने हे स्थान पटकावलं आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याने आपल्या आईला समर्पित केली आहे. ‘माझ्या आईचं हे स्वप्न होतं. तिला मला क्रिकेटमध्ये मोठे सामने खेळताना पहायचं होतं,’ असं प्रियमने सांगितलं. प्रियमच्या आईचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं.

प्रियम उजव्या हाताने खेळणारा फलंदाज आहे. तो यूपीच्या रणजी संघात होता. त्याने वयाच्या आठव्या वर्षीपासून खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे आई-वडिल त्याचा खेळाकडे असणारा ओढा पाहून काहिसे चिंतेत होते. त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं त्यांना वाटे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments