३ डिसेंबर
हिंजवडी येथील आयटी पार्क मधील टीसीएस कंपनीत सहाव्या मजल्यावर फ्रंट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मंगळवार (३ डिसेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. कपिल गणपत विटकर (३९ रा. उँड्री) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विमानात बॅगची चेन लॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक टॅग एकत्र करून त्याने गळ्याला फास (लॉक) करून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांचा मागील महिन्यात राहत्या घरात अपघात झाला होता. तेव्हा पासून त्यांच्या पाठीला दुखणे सुरू झाले आहे. मागील काही दिवस ते सुट्टीवर देखील होते. त्याने कार्यालय कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. पण त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
कपिल यांचे लग्न झाले असून ते परिवारासह उन्ड्री येथे वास्तव्याला आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलिसांनी तत्काळ घ्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कपिल आत्महत्या करतानाचे रेकॉर्डिंग सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले नाही. परंतु त्यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टॅग गुंडाळलेले आढळून आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी तपास करीत आहेत.