शरीराच्या कुठल्याही भागावर शस्त्रक्रिया झाल्यास तेथील त्वचेवर कट दिला जातो. असे कट पुन्हा जोडण्यासाठी टाके घातले जातात. काही टाके हे सुकल्यावर काढून टाकायचे असतात तर काही टाके हे शरीराच्या आतील अवयवांवरचे असून कालांतराने आपोआप विरघळणारे असतात. पण आता या टाक्यांच्या वेदनेपासून सुटका होणार आहे. अमेरिकेतील बायोमेडिकल शास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे सर्जिकल ग्लू तयार केले आहे.
हे ग्लू जखमेवर लावताच काही वेळातच जखम आपोआप सील होऊन जाते आणि घाव भरून येतो. त्यामुळे टाके घालण्याची प्रक्रिया न करताच घाव भरून येणे शक्य होणार आहे.या ग्लू मधील जेलसम दिसणारा पदार्थ घावावर लावल्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या वापराने हे जेल सक्रिय केले जाते. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे हे जेल संपूर्णपणे विरघळून घाव व्यवस्थित सील करते. या ग्लूची जनावरांवर केली गेलेली चाचणी १०० टक्के यशस्वी झाली असून आता लवकरच मनुष्यांवर या ग्लूची चाचणी केली जाणार आहे.
टाक्यांशिवाय शस्त्रक्रिया – जखमेवर टाके घालण्यापासून सुटका
RELATED ARTICLES