Wednesday, June 19, 2024
Homeताजी बातमीज्ञानेश्वर महाराजांनी आद्य मराठीची वैशिष्ट्ये मांडली-प्रा. रोहिणी कणके

ज्ञानेश्वर महाराजांनी आद्य मराठीची वैशिष्ट्ये मांडली-प्रा. रोहिणी कणके


एसबी पाटील पब्लिक स्कुल मध्ये जागतिक मराठी भाषादिन साजरा
२ मार्च २०२०,

मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शके 905 मधील शिलालेखावर सापडते. ‘श्री चामुण्डेराये करविले’ असा उल्लेख शिलालेखात आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी व मुकुंदराज यांनी सर्वमान्य आद्य मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडली. संत ज्ञानेश्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे अशी माहिती प्रा. रोहिणी कणके यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये आज जागतिक मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या हस्ते कुसूमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. रोहिणी कणके यांनी मराठी भाषादिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. मंजूषा नाथे लिखीत ‘कोण होणार गणपती ?’ हे हसत हसत समाजप्रबोधन करणारे नाटक आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचा संदेश देणारे मराठी नाटक सादर केले. संगीत शिक्षिका सुलोचना पवार यांनी “हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हे गीत सादर केले. प्रा. वंदना सांगळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल व्याख्यान दिले. सावरकरांच्या ‘जयोस्तुते…’या अजरामर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विज्ञान शिक्षिका तृप्ती झारकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. रोहिणी कणके यांनी सांगितले की, दिड हजार वर्षांहून जास्त इतिहास असणा-या मराठी भाषेचे मुळ आर्यांमध्ये सापडते. सन 500 – 700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडते. शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी रचलेला ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ समजला जातो. महाभारतावर आधारित लिहिलेला भगवद्‌गीता ग्रंथ सर्वसामान्यांना समजावा यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘भावार्थ दीपिका’ या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले ‘लीळाचरित्र’ म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेंव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठी भाषेच्या शिरपेचात सुवर्ण तुरा रोवला. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते. हे मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे. कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झाले परंतू भाषेतील गोडवा वृध्दीगंत होत गेला अशीही प्रा. कणके यांनी दिली.

स्वागत वंदना सांगळे, सूत्रसंचालन सुनिता पाटील आणि आभार स्नेहल कोकरे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments