१९ आॅक्टोबर
काल सातारा येथील प्रचार सभेत शरद पवारांच्या भाषणा दरम्यान पावसाने जाेरदार हजेरी लावली परंतू या भर पावसात ही सभा रद्द न करता, कार्यकत्यांना भिजताना पाहून स्वता:च्या डोक्यावर धरलेली छत्री बाजूला काढून भर पावसात मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांना संबोधीत केले.
मा.शरद पवार हे नेहमीच आशादायक व उर्जाने भरलेले एक अजब रसायन आहे,या विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात प्रेरणादायी फोटो आहे.तुम्ही कोणाचे समर्थक आहात हा मुद्दा वेगळा पंरतू ही जिद्द ही उर्जा येते तरी कोठून ? तरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह या वयात ही असणे हेच खरचं बलस्थान आहे शरद पवारांचे.
विषय कोणताही असो मग तो ईडीचा विषय असो किंवा धो धो कोसळणार पाऊसचा, त्याला सामोरे जाणे हाच आपला स्वभाव,हे पवार साहेबांनी काल त्यांच्या वागण्यातून दाखवून दिले.
सामाजिक,राजकिय जिवणात लढणारया,संघर्ष करण्यारया प्रत्येक माणसासाठी शरद पवाराचां हा क्षण आणी हा फोटो महत्वाचा आहे. ज्या राजकिय विद्वानांना वाटत होते पवार संपले,पक्ष संपला, पंरतू अशा परिस्थितीमध्ये ही पक्षाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेऊन अवितरतपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करुन मी, माझा पक्ष आणी माझे विचार अजून संपलेले नाहीत ते अजून चिरतरुण आहेत,हे दाखवून देण्याचे काम पवार साहेब मोठ्या जिद्दीने करत आहेत.
२४ आॅक्टोबरला निवडणुकीचा निकाल आहे, तो काय असेल ?कोण जिंकेल..? हे आताच सांगणे घाईच ठरेल पंरतू
महाराष्ट्रातील जनतेची, तरुणांची आणी विरोधकांची मनं मात्र पवार साहेब तुम्नहाल नक्कीच जिंकली आहेत, कालपासून सोशल मिडीयावर एकच चर्चेचा विषय पवार साहेब..,
पवार साहेब आणी त्यांची उर्जा..! हे सर्व पाहून त्या ८० वर्षाच्या चिरतरुण मित्राला एकच म्हणावे वाटते, तू जिंकलंस मित्रा..!
जिंकलस मित्रा …. ८० वर्षाचा चिरतरुण – शरद पवार
RELATED ARTICLES