Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीछट पूजेनिमित्त ‘बेटी बचाओ - नारी शक्ती’ हि संकल्पना प्रेरणादायी.....शिवाजीराव आढळराव पाटील

छट पूजेनिमित्त ‘बेटी बचाओ – नारी शक्ती’ हि संकल्पना प्रेरणादायी…..शिवाजीराव आढळराव पाटील

3नोव्हेबंर
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेनिमित्त इंद्रायणी नदी तीरावर भव्य गंगा आरती संपन्न
आपले कुटूंब व राष्ट्राच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला निसर्गात आणि समाजात एकरुपता साधत समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करीत छटपुजेचे व्रत मनोभावे करतात. या वर्षी विश्व श्रीराम सेना या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी घाटावर छट पुजेनिमित्त आयोजित उत्सवात ‘बेटी बचाओ – नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारीत सादर केलेले कार्यक्रम महिला भगिनींना प्रेरणादायी आहेत, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर छटपूजेनिमित्त शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) सायंकाळी भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, सिने कलाकार जुनियर गोविंदा, उद्योजक कार्तिक लांडगे, प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव, भोसरी शिवसेना संघटक धनंजय आल्हाट, पांडूरंग साने, संस्थेचे सल्लागार सुभाष माछरे, निलेश बोराटे, अतुल बोराटे, निखिल बोराडे, मंगेश हिंगणे, योगेश बोराटे, चेतन बोराटे, बबन हिंगणे, नितिन गायकवाड़, आबा घारे, उमेश सिंह, छठ पूजा समिती सदस्य श्यामबाबू गुप्ता, विनोद प्रसाद, मुन्ना सिंह, उमेश सिंह, किरण गायकवाड़, पृथ्वी प्रसाद, ब्रिजेश प्रजापती, रोहित प्रसाद, विकास गुप्ता, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, अक्रम शेख़, राहुल गुप्ता, प्रकाश कांबळे, विवेक भुजबळ, पप्पू गुप्ता, डॉ. पंकज गुप्ता, सत्यम गुप्ता, आदित्य गुप्ता आदिंसह हजारो भक्त भाविक, महिला भगिनी उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त गुरुवारी (दि.31 ऑक्टोबर) सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, शुक्रवारी (दि. 1 नोव्हेंबर) छोटकी छट, शनिवारी (दि.2 नोव्हेंबर) सूर्यास्तावेळी 6.02 मिनिटांनी भव्य गंगा आरती हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. तसेच ‘बेटी बचाओ – नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारीत कोल्हापूर येथील सर्वोदय या संस्थेच्या मुलींनी चित्तथरारक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.
तसेच विविध, धार्मिक, सामाजिक,प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments