Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीचोरट्यांनी चक्क एटीएमच पळवलं , चाकणमधील प्रकार

चोरट्यांनी चक्क एटीएमच पळवलं , चाकणमधील प्रकार

४ नोव्हेंबर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील चंद्रश्री कॉप्लेक्स येथील गाळा क्रमांक 11 मध्ये असणारे एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिवसभर अज्ञात दोन चोरांनी टेहळणी केली, मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओतून येत एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र हा प्रयत्न फसल्याने चक्क एटीएमला दोरी गुंडाळून ते मोटारीत घालून पळवून नेले आहे.
एटीएममध्ये सीसीटीव्ही होता त्यावर चलाख चोरांनी स्प्रे मारला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे संबंधित घटना आणि अज्ञात व्यक्ती हे सीसीटीव्हीत कैद झालेले नाहीत. एटीएम मशीन आणि त्यामधील रोख रक्कम अशी १८ लाख ९८ हजार रुपये चोरांनी पळवून नेले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम मशीन च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनेकदा एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी मध्यरात्री सुरक्षा पुरवली जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. अज्ञात चोरांचा शोध चाकण पोलिस घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments