Wednesday, June 18, 2025
Homeउद्योगजगतचला पुन्हा आणूया आपले सरकार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

चला पुन्हा आणूया आपले सरकार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा आयोजित करण्यात आली होती. मोदींचे सभास्थळी आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोबाइल टॉर्च ऑन करून त्यांचे जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर मोदींनी ‘कसं काय पुणेकर’ अस मराठीत भाषणाला सुरुवात केली. पुणे शहर भारत देशाला संस्काराची शिकावण देते, लोकमान्य टिळकांच्या काळात स्वराज्यासाठी लढाई होती ,पंरतु आता सुराज्यसाठी लढाई करायची आहे, मोठी स्वप्न साकार करायला निघालो आहे परंतु मला वस्तुस्थितीचे भान आहे ,देशातील युवकावर मला विश्वास असून नव्या भारत साठी तयारी करावी लागणार, हे सरकार प्रामाणिकपणाशी कटिबद्ध आहे , ५ वर्षाचे काम १०० दिवसात करून दाखवले व आणखी खूप काही करायचे आहे, पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी खर्च करणार असून, पुणे – पंढरपूर महामार्ग पुर्णतः कडे जात आहे ,
यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांनी देशातील जनतेच्या पैशाची लूट केली. त्यांना आम्ही तुरुंगात धाडले. हा सिलसिला सुरूच राहणार. तो थांबणार नाही. जनतेचा पैसा परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी मोदींनी ३७० कलमाचा उल्लेख करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ३७० कलम हटविणे म्हणजे एक व्यवस्था हटविणे नाही.भारताने ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचं टार्गेट ठेवलं असून हे ध्येय गाठल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं सांगतानाच आज भारत जगामधील एफडीआय फ्रेंडली देश म्हणून ओळखला जातो, असं त्यांनी सांगितलं.
सर्व जगात भारताचा डंका वाजत आहे याचे श्रेय १३० कोटी भारतीयांना आहे, अर्थव्यवस्था जेवढी मोठी असेल तेवढ्याच गतीने आपण गरीबीवर मात करू. तेवढ्याच गतीने मध्यमवर्गाचा दर्जा उंचावेल आणि तरुणांच्या इच्छा-अपेक्षाही आपण पूर्ण करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदींनी मतदारांना लोकसभेच्या मतदानाचे सर्व विक्रम मोडण्याचे आवाहन केलं.विशेष म्हणजे मोदींच्या पुण्यामधील भाषणामध्ये युवकांवर जास्त भर होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments