३१ जानेवारी २०२०
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा वॉटर ग्रीन प्रकल्पाला ब्रेक लागण्याचे संकेत दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर येथे मध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, ‘लोकोपयोगी योजना बंद करणं हाच महाविकासाघाडीचा पहिला अजेंडा,’ असा टोला ठाकरे सरकारवर लगावला. तसेच एखाद्या गोष्टीमध्ये काय चूक असेल तर त्याची चौकशी लावा त्यामध्ये दोषी असेल तर कारवाई लावा, पण ती एखादी योजना लोकोपयोगी असेल बंद करू नका,’ असे आवाहन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केले
‘रोज नवीन काहीतरी राज्य सरकार बाहेर काढत आहे. मात्र, कशाचीच चौकशी करीत नाही, शोध लावत नाही किंवा निष्कर्षही काढत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची मला कमाल वाटते, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात केली होती.
चंद्रकात पाटील यांचा महाविकास आघाडीला टोलाचंद्रकात पाटील यांचा महाविकास आघाडीला टोलादरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारला दिला.