२१ फेब्रुवारी २०२०
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेक्टर क्र. २३, निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र व स्काडा प्रणालीची माहिती घेण्यासाठी आलेल्या गुजरात राज्याचे पाणीपुरवठा पशुसंवर्धन व ग्रामीण गृहनिर्माण मंत्री कुवरजीभाई बवालिया यांचे स्वागत महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. या शिष्टमंडळाच्या समवेत खाजगी सचिव राजेश रावल, मुख्य अभियंता निरव सोलंकी, कार्यकारी अभियंता परेश चोक्सी यांचा सहभाग होता. यावेळी सहा. आयुक्त अण्णा बोदडेसह, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, आदी उपस्थित होते.