१ नोव्हेंबर
अक्षयने हा हृदयस्पर्शी अनुभव फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे
बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेस तसेच सामाजिक कार्यामुळे सतत चर्चेत असतो. अक्षय त्याच्या मुलांनादेखील फिटनेसचे धडे देत असतो. नुकताच अक्षय कुमार मावळातील शिळींब परिसरातील हिलटन हाॅटेल येथे दिवाळी
सुट्यासाठी आपल्या कुंटूबासोबत आला होता, सकाळी नितारासोबत मॉर्निंग वॉकला गेला असल्याचा फोटो चर्चेत आहे.
अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर मुलीसोबत मॉर्निंग वॉकला गेल्याचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान अक्षयने एका गरीबाच्या घरात जाऊन प्यायला पाणी मागितल्यानंतरचा हृदयस्पर्शी अनुभव सांगितला आहे. ‘आजचा मॉर्निंग वॉक हा माझ्या लहान मुलीसाठी एक धडा होता. आम्ही एका वृद्ध जोडप्याच्या घरी पिण्यासाठी पाणी मागण्यास गेलो आणि त्यांनी आम्हाला पाण्यासोबत खायलाही दिले. माझ्यासाठी हा हृदयस्पर्शी अनुभव होता’ असे अक्षयने कॅप्शन दिले आहे.
गरीबाच्या घरच्या पाहुणचाराने अक्षय भारावला; सोशल मिडीयावर शेअर केला फोटो
RELATED ARTICLES