१५ ऑक्टोबर २०१९
उदयनराजेंनी मुलाखतीत सांगितले कि मी पर्यटन मंत्री राजकुमार रावल यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा केली असून सरकारच्या या निर्णयात मला काही चुकीचे वाटत नाही. आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशाची अर्थव्यवस्था हि पर्यटनावर अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी दर्शविला.
हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील २५ किल्ल्यांची निवड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले वगळता इतर किल्ल्यांच्या विकासाचे सरकारचे धोरण आहे. परिणामी याबाबतीत विरोधकांनी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
गडकिल्ले भाड्याने देण्याच्या सरकारच्या निर्णयाला उदयराजेंचा पाठिंबा
RELATED ARTICLES