१८ ऑक्टोबर २०१९
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना हृतिक ने खुलासा केला कि चित्रीकरणाआधीच बहुचर्चित असलेला ‘क्रिश ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माझ्या वडिलांना बरं नसल्यामुळे या चित्रपटाला विलंब झाला पण आता त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली झाल्याने आम्ही लवकरच या चित्रपटाला सुरुवात करणार आहोत,’ अशी माहिती हृतिक ने दिली.
‘क्रिश चित्रपट मालिका’ ही रोशन कुटुंबियांना हृदयाजवळची असल्याने राकेश रोशन यांना हा चित्रपट एका वेगळ्याच स्तरावर नेण्याची इच्छा आहे. या चित्रपटाचे २५० कोटी बजेट असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी ते फार मेहनत घेत आहेत.
‘क्रिश ४’ मध्ये पुन्हा दिसणार हृतिक…??
RELATED ARTICLES