२६ ऑक्टोबर,
कोथरूड मध्ये रंगकाम चालू असतना दोन कामगारांचा पडून मृत्यु झाला. या संदर्भात मिळालेली माहिती अशी कि कोथरूड येथे महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगरच्या बाजूला एका २० मजली इमारतीचे रंग करण्याचे काम चालू असून, रंग काम करत असताना लावलेला पाळणा तुटून दोन कामगारांचा पडून मृत्यु झाला, दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान हि घटना घडली, अग्निशामक दलाला हि माहिती मिळताच कोथरूड येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली, पाळणा मधेच अडकून पडल्यामुळे आणखी काही अपघात होऊ नये म्हणून अग्निशामक दलाचे जवान कामगारांच्या मदतीने घटनास्थळी काम करत आहेत.
कोथरूड मध्ये २ कामगारांचा पडून मृत्यु
RELATED ARTICLES