१३ फेब्रुवारी २०२०
ऍड्रेस हेल्थ या संस्थेच्या वतीने ‘Healthy Children Happy Children’ या स्पर्धेमध्ये कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ” Healthy School” म्हणून विजेती ठरले
मुलांचा विकास आणी मुंलाना घडवण्यात शाळेची भुमिका महत्वाची असते. विद्यार्थानां भावनिक आणि शाररिक दृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेत विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
सर्व समावेशक शालेय आरोग्य प्रभावीपणे सुधारण्यासाठी, विद्यार्थांना आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी शाळेत वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले जाते.
कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल नेहमीच विद्यार्थींच्या आरोग्यास सर्वोच प्राधान्य देते. डॉक्टरांच्या टीम मार्फत शाळेला भेट देऊन मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्य कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात त्यामध्ये योग्य आणि विशिष्ट मार्गदर्शन व समुपदेशन दिले जातात.
‘कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल’ला ‘‘Healthy School’’ म्हणून स्कूल हेल्थ अॅवॉर्ड्स २०१९-२० द्वारे गौरविण्यात आले आहे. यावेळी ‘कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल’चे डायरेक्टर धनंजय वर्णेकर आणि संचालक राम रैना सर उपस्थित होते. तसेच ते म्हणाले कि कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल सदैव मुलांच्या शाररिक व मानसिक आरोग्यासाठी कार्यशील राहील.