पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप रविवारी (25 ऑगस्ट) G-7 देशांच्या परिषदेत भेटणार आहेत.
या भेटीदरम्यान ट्रंप मोदी यांना जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत तसंच जम्मू-काश्मीर, लेह केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासंबंधी विचारणा करू शकतात.
प्रादेशिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची काय योजना आहे तसंच जगातील सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताचा काश्मिरमधील नागरिकांच्या मानवाधिकार हक्कांबाबत काय भूमिका आहे हे अमेरिकेला जाणून घ्यायचं आहे अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.
काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिल्यापासून ट्रंप सातत्याने काश्मीर या मुद्यावर बोलत आहेत. अनेकदा त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं आहे.