७ डिसेंबर
थेरगाव येथील ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात काळा खडक परिसरा जवळील पंडीत पेट्रोल पंपा शेजारी वर्षानुवर्षे फुटपाथवर पथारी व्यवसाय करीत असलेले ब्लॅंकेट, टेडी बेअर, व ईतर साहीत्य विनापरवाना विक्री करणारया व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करुन ६ ट्रक साहीत्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहीत्य कै.मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे जमा करण्यात आले आहे.सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन या कारवाई कामी २ बिट निरीक्षक व १७ होमगार्ड हजर होते.
अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य पुढील प्रमाणे आहे.
१. ब्लॅंकेट सर्व प्रकारचे ११६३ नग
२. टेडी बेअर सर्व प्रकारचे २६५ नग
३. बसकर सर्व प्रकारचे ७९२ नग
४. ऊशी, लोड सर्व प्रकालचे ५३३ नग
५.चादर, बेडशिट सर्व प्रकारचे ९२ नग
६. झुला लहान ९ नग
७. स्वेटर सर्व प्रकारचे ५५ नग
वरील सर्व जप्त साहित्य मोजनी करुन लोखंडे कामगार भवन येथे ठेवण्यात आले आहे.