२ नोंव्हेंबर,
एक्स्प्रेस वेवरील वाढत्या वेगामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने, वेगमर्यादेला आवर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. सध्याची वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर एवढी होती. ती १०० करण्यात आली असून, येत्या १८ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील रस्त्यांची ‘एक्स्प्रेस-वे’, चार किंवा त्यापेक्षा अधिक लेनचे महामार्ग, नगरपालिका हद्दीतील रस्ते आणि अन्य रस्ते अशी वर्गवारी करून वेगमर्यादा निश्चित केली होती. केंद्रीय मंत्रालयाने ६ एप्रिल २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार, ‘एक्स्प्रेस-वे’वर खासगी मोटार आणि चालक व आठ प्रवासी क्षमतेच्या वाहनांना १२० किमी आणि चालक व नऊपेक्षा अधिक प्रवासी क्षमतेच्या वाहनांना १०० किमी प्रतितास आणि मालवाहू वाहनांसाठी ८० किमी वेग मर्यादा निश्चित केली आहे. महामार्गांवर खासगी मोटारी व आठ प्रवासी क्षमतेच्या वाहनांना १०० किमी प्रतितास, तर चालक आणि नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी क्षमतेचे वाहनांची वेगमर्यादा ताशी ९० किमी निश्चित केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘एक्स्प्रेस-वे’वरील ताशी कमाल वेगमर्यादा ८० किलोमीटरवरून १२० किलोमीटर करण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने जुलैमध्ये हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, बेशिस्त आणि अतिवेगातील वाहनांमुळे एक्स्प्रेस वेवर अपघात होत असल्याने वेगमर्यादा कमी करण्याची मागणी केली जात होती. महामार्ग पोलिसांनीदेखील त्यासाठी जोर लावला होता. अखेरीस त्यांची मागणी पूर्ण झाली असून, राज्य रस्ते विकास महामंडळाने एक्स्प्रेस वेची वेग मर्यादा १२० ऐवजी १००पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
एक्स्प्रेस वेची वेगमर्यादा आता प्रतितास फक्त १०० कि. मी.
RELATED ARTICLES