२१ नोव्हेंबर (सर्व फोटो सचिन फुलसुंदर)
उर्सेखिंडीतील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये वारंवार दरड कोसळून प्रवासाला अडथळा येत होता, त्यावर आता उपाय योजना करण्यात येत आहे. उर्सेखिंडीतील सुरक्षारक्षक जाळी बसवण्याचे काम मागील काही दिवसापासून चालू असून ते आता पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहे.त्यामुळे उर्सेखिंडीतील दरड कोसळण्याचे प्रमाण कमी होणार असून प्रवास आता सुरक्षित होऊ शकतो. खिंडीत दर वर्षी पावसाळ्यात दरड कोसळत असत त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संताप व्यक्त करत परंतु आता रस्ते विकासमहामंडळांनी आता येथील दरडीवर जाळी बसवण्याचे काम हाती घेतल्यामुळे उर्सेखिंडीतुन प्रवास करणार्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. उर्सेखिंड पंचक्रोशीतील गावांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे.
उर्सेखिंडीतील सुरक्षारक्षक जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात
RELATED ARTICLES