२१ ऑक्टोबर २०१९
भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी लांडेवाडी भोसरी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत मतदान केले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा दादू बनसोडे यांनी चिंचवड स्टेशन येथील कै. गंगाराम बहिरवाडे प्राथमिक विद्यालय येथे मतदान केले. यावेळी डावीकडून मुलगा सिद्धार्थ, मुलगी श्वेता, आमदार अण्णा बनसोडे, पत्नी प्रिया, मुलगी शिवाणी.
खासदार अमर साबळे यांनी पिंपरी स्टेशन येथील ज्यूडसन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पत्नी भारती साबळे व कन्या वेणू साबळे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनहित लोकशाही पार्टीच्या उमेदवार नताशा लोखंडे यांनी चिंचवड गावातील जैन फत्तेचंद शाळेत मतदान करून आपला हक्क बजावला.
उमेदवारांनी ही लावली मतदानाला हजेरी
RELATED ARTICLES