३ नोव्हेंबर
उन्नति सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या वेळीसुद्धा सामाजिक बांधिलकीची जाण ठेउन कार्यरत असलेल्या उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने मान-संवर्धन व्रुध्दाश्रम पिंपळे निलख येथे भाऊबिज साजरी करण्यात आली. आयुष्याच्या उतारवयात नातेसंबंधाला आसुसलेल्या व्रुध्दाश्रमातील जेष्ठ नागरिकांना या उपक्रमाने नवी उभारी मिळाली.
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व महिला सभासद आणि आनंद हास्य योग क्लबच्या महिला सदस्यांनी वृद्धाश्रमातील नागरिकांना औक्षण केले. व उपस्थित सर्वानी वृद्धाश्रमातील नागरिकांसोबत दिवाळी फराळ केला व त्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी उषा वाकचवरे, जयश्री भोसले, पद्मीनी गवळी, सुनीता जयस्वाल, उषा अग्रवाल, नंदा पवार, दीपा साऊ, वनिता रोकडे, नीलिमा सावंत, सुरेखा कुलकर्णी, रेखा खंडेलवाल, आभा तिवारी, विमल पुजारी, निर्मला कासार व अन्य महिला सभासद व उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, आनंद हास्य योग क्लबचे सेक्रेटरी राजेंद्र जसवाल, केशव मुजुमदार, विजय रोकडे, विनोद भल्ला, अनिल कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“आयुष्याच्या उतारवयात नातेसंबंधाला आसुसलेल्या जेष्ठ नागरिकांसोबत किंवा समाजातील अनेक वंचित घटकांसोबत आपण आपले सण-उत्सव साजरे करणे म्हणजे खऱ्या अर्थाने देवाची व देशाची सेवा करणे होय ” असे मत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी व्यक्त केले तर ” उन्नती सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमामुळे बहिणीच्या मायेच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्धांना पुन्हा एकदा मिळाली बहिणीची माया ” असे मत उमेश भागवत यांनी व्यक्त केले.
उन्नतीची सोशल फाऊंडेशन ची भाऊबीज साजरी
RELATED ARTICLES