२३ ऑक्टोबर, न्युज १४ (Exclusive)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ चे निकाल उद्या लागणार असून त्यासाठी निवडणुक अधिकारी सर्व प्रकारची तयारी करत असून ते निकाल देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पिपंरी, चिचंवड आणी भोसरी मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रिडीसंकूल बालेवाडी येथे होणार आहे.
उद्या सकाळी ८ वाजता टपाली मतदानापासून मतमोजणीची सुरवात होणार असून उद्या सकाळी ८ वाजेपर्यत टपालाधून प्राप्त झालेले सर्व टपाली मतदान ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहीती पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली ,
टपाली मतदान मोजण्यासाठी साधारणत: २ तासाचा तरी अवधी लागू शकतो. टपाली मतमोजणी सुरू करून टपाली मतपत्रिका उमेदवार प्रतिनिधी समोर उघडणेत येतील यासमवेत मतदान यंत्रावरिल मतमोजणीस सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल, यासाठी एकूण २० टेबल ठेवण्यात आले असून यासाठी १ सुपरवायझर ,१ मतमोजणी सहाय्यक,१ मतमोजणी निरिक्षक (ऑब्झर्व्हर), मतमोजणी करतील व त्यांच्याकडून संगणक विभागाकडे याची नोंद होईल व नंतर निकाल जाहीर करण्यात येईल. या दरम्यान कोणी काही आपेक्ष घेतल्यास त्यांचे शेवटी शकांनिरसन करण्यात येईल पंरतू त्यासाठी मतमोजणी थांबवली जाणार नाही.
मतदान यंत्र काढणे व परत ठेवणे यासाठी १० ते १५ कर्मचारी काम करणार असून २ नोडल ऑफिसर आहेत.
निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली इंदाणी- उंटवाल,सहाय्यक अधिकारी श्री दिपक वजाळे, श्री संदीप खोत आणी श्रीमती स्वाती पाटील हे सहा.निवडणूक निर्णय पातळींवर काम पाहात आहेत,
तर मतदान यंत्रे उघडणे मतमोजणी केंद्रांवर पाठवणे यासाठी श्री मनोज सेठिया व श्री सुनिल वाघुंडे हे काम पाहत आहेत.
तर मिडीया नोडल अधिकारी म्हणुन श्री विजय भोजने काम पाहत आहेत.
उद्या होणारया मतमोजणी साठी निवडणुक अधिकारी सज्ज..!
RELATED ARTICLES