२६ नोव्हेंबर
येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे.
ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शपथविधी सोहळयासाठी महापालिकेला तयारी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते.
उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिले.