पिंपरी । १५ ऑक्टोबर २०१९ : पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टिंग एलएलपी आणि लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल या कंपन्यांनी विदेशातील एका कंपनीकडून माल खरेदी करण्यासाठी ईमेलद्वारे संपर्क साधला. श्री. मधुसूदन अग्रवाल व श्री. सुनील मित्तल हे दोघे या कंपनीचे संचालक आहेत. या भारतीय कंपनीने त्यानुसार रक्कम अदा केली. हॅकरने विदेशी कंपनीचा ईमेल हॅक करून बँक बदलली आणि नवीन खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मात्र पैसे मिळाले नसल्याचे चिनी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे ईमेल आयडीच्या दोन अक्षरात फेरबदल करून फसवणूक करण्यात आल्याचे मित्तल यांच्या लक्षात आले.या प्रकरणी त्यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलला तक्रार दर्शवली.
या फसवणूक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने विदेशी कंपनीशी संपर्क साधून युकेतील संबंधित बँकेकडे ईमेल द्वारे संपर्क साधून सदर खात्यातील व्यवहार थांबविण्यास सांगितले. ‘पेमेंट गेटवे द्वारे’ हा फ्रॉड झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे विदेशातील बँकात गेलेले ५० लाख ७६ हजार ३३७ रुपये भारतातील या फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांना परत मिळाले. सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गरुड, पोलीस कर्मचारी मनोज राठोड, भास्कर भारती, अतुल लोखंडे, नितेश बीचवर, विशाल गायकवाड यांच्या पथकाने हि कामगिरी गेली.