२२ ऑक्टोबर २०१९
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने ‘ईपीएफ कायदा १९५२’ मध्ये बदल करण्याची तयारी चालवली आहे. जगभरातील बहुतांश पेन्शन फंडांनी पेन्शन प्राप्त करण्याची वयोमर्यादा ६५ इतकी निर्धारित केली आहे. त्यामुळे भारतातही बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे ‘एम्प्लॉईज प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशन’ च्या नियमांनुसार सध्या दहा वर्षांची नोकरी केल्यांनंतर नोकरदार पेन्शन प्राप्तीसाठी गृहीत धरला जातो. त्यानंतर वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्या संबंधित नोकरदाराला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होते. मात्र, हि वयाची मर्यादा ५८ वरून ६० वर नेण्याची केंद्र सरकारची योजना आहे. ‘ईपीएफओ’ च्या केंद्रीय विश्वस्त समितीच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘ईपीएफओ’ च्या योजनेच्या अंतर्गत ६० लाख सभासदांचा समावेश आहे.
‘ईपीएफ कायदा १९५२’ मध्ये बदल – पेन्शन प्राप्तीच्या वयात बदल होणार…?
RELATED ARTICLES