३० जानेवारी २०२०
देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाही समान आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांना लक्ष्य केले. जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा अपमान केला असून तो सहन करणारा नाही असेल काँग्रेस नेत्यांनी जितेंद्र आव्हाड याना खडसावले आहे.
बीडमधील ‘संविधान’ बचाव महासभेमध्ये आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर देखील टीका केली. इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असेही आव्हाड म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आव्हाड यांनी खुलासा करणारे ट्विट केले आहे. आव्हाड यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी-शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकणार नाही, असे आव्हाड म्हणाले.
आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे इंदिरा गांधींनी सुद्धा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला असे म्हणत केले लक्ष ; जितेंद्र आव्हाड सुद्धा ते म्हणाले.