४ नोव्हेंबर
इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत इंगळे यांची निवड करण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशनच्या (आय.डी.ए.) सर्वसाधारण सभेत डॉ. इंगळे यांची सन 2019-2020 साठी व डॉ. मनीषा गरूड यांची सन 2020-2021 साठी अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सचिव डॉ. संदीप भिरुड, खजिनदार डॉ. सुमंत गरुड, उपाध्यक्ष डॉ. मोना दिवाण, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. श्रीकांत राव, सहसचिव डॉ. निलेश पाटील, डॉ. जयंत फरांदे आणि यावर्षीच्या कार्यकारीणीमध्ये डॉ. निखिल दिवाण, डॉ. संतोष पिंगळे, डॉ. अतुल पाटील, डॉ. हिमांशू अजवानी, डॉ. डिंपल अजवानी, डॉ. दीपाली पाटेकर, डॉ. संयुक्ता खैरनार, डॉ. अनुजा कृष्णा, डॉ. मीनाक्षी घोळकर, डॉ. प्रतिभा भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच आयडीएच्या वतीने प्रकाशित करण्यात येणा-या त्रैमासिकाच्या संपादकपदी डॉ. सचिन फुंदे व उपसंपादक पदावर डॉ. राम पाटील यांची निवड करण्यात आली.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी डॉ. यशवंत इंगळे
RELATED ARTICLES