२३ ऑक्टोबर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आता काही तास उरले आहेत. २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी राज्यभरात ६० टक्के मतदान झालं आहे. त्यानंतरच्या एक्झिट पोलमधून भाजप-शिवसेना महायुतीकडेच महाराष्ट्राचा कल असल्याचं दिसत आहे.
कुणाला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता आहेच पण राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड मधील ३ मतदार संघातून साधारण झालेले मतदान यामधून कोणाला संधी मिळणार ? विद्यमान आपली जागा राखणार का ? नवीन बदल होणार ? याची उत्सुकता उमेद्वारांप्रमाणे सामान्य जनतेला हि लागली आहे. या दिवाळीत कोणाचा बार उडणार हे उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणी चालू झाल्यानंतर कळेल, दरम्यान पिंपरी चिंचवड येथील मतमोजणी बालेवाडी येथे होणार असून केंद्रावर चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रारंभ होणार असून साधारणतः दुपारी २ वाजेपर्यंत पहिला निकाल हाती लागण्याची शक्यता आहे.
आता उत्सुकता निकालाची …
RELATED ARTICLES


