३०ऑक्टोबर ,
भाजप –
मुंबईत आज भाजपच्या विधामंडळात नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिॅग तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित रहाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस-
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मुंबईतल्या कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता आणि विरोधीपक्ष नेता कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
काँग्रेस-
तर आज दुपारी ४.०० वाजता दादरमधल्या टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
आज शिवसेना सोडून सर्वच राजकीय पक्षांच्या मुंबई इथे बैठका होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे
आज विविध राजकीय पक्षांच्या मुंबईमध्ये बैठका
RELATED ARTICLES