२६ ऑक्टोबर,
आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसंच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आज मातोश्रीवर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक
RELATED ARTICLES