‘पृथ्वीचं फुप्फुस’ असं वर्णन केल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या सदाहरित जंगलाला भीषण आग लागली. या जंगलांना लागलेल्या आगीमुळे दुर्मीळ प्रजातीची वृक्षसंपदा नष्ट झाली आहे.
आगीनं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हॉलीवूड अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रिओने 5 मिलिअन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे. लिओनार्डोची पर्यावरणासाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत ही रक्कम दिली जाईल.
‘अॅमेझॉन जंगलांना लागलेल्या आगीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. हवामान बदल, जैवविविधता आणि स्थानिकांची स्थिती यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी पुढाकार घेऊन अॅमेझॉन जंगलांसाठी पुढाकार घ्यावा,’ असं आवाहन लिओनार्डोने इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केलं आहे.
अॅमेझॉनचं रक्षण करणाऱ्या ‘अर्थ अलायन्स’ या संस्थेतर्फे स्थानिक गट आणि समाजाला ही मदत पुरवण्यात येईल. अॅमेझॉन जंगलांमध्ये गेल्या वर्षभरात आग लागल्याचे 72 हजार हून अधिक प्रसंग घडल्याची माहिती ब्राझीलमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च संघटनेने दिली आहे.
अमेझॉन जंगलाच्या रक्षणासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओची 5 मिलिअन डॉलर्सची मदत
RELATED ARTICLES