अनधिकृत लोन अ‍ॅप्स Google Play Store वरून काढून टाकण्यात सायबर पोलीस पिंपरी-चिंचवड यांना मोठे यश..

0
15

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याच्या तक्रारीनंतर ५ अनधिकृत कर्जवाटप करणाऱ्या लोन अ‍ॅप्स आणि लेंडिंग अ‍ॅप्सना Google Play Store वरून हटवण्यात यश मिळाले आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या अ‍ॅप्समुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होतो आहे, हे लक्षात घेता ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली.

सायबर पोलिसांकडे नागरिक, विद्यार्थी, तसेच काही व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अशा अ‍ॅप्सविरोधात तक्रारी येत होत्या. हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून अल्प माहितीवर कर्ज उपलब्ध करून देत. नंतर मात्र मोठ्या व्याजदराने वसुली करताना धमकावणे, फोटो मॉर्फिंग, बदनामी यांसारख्या प्रकारांना बळी पडावे लागत होते.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. दीपाली स्वामी (सायबर सल्लागार) यांनी आर.बी.आय व गुगलला पत्रव्यवहार करून ही अ‍ॅप्स हटवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये ५ अ‍ॅप्स Google Play Store वरून हटवण्यात आली आहेत:

1. CreditLens

2. Recapmta

3. RPMTA

4. CreditPilot

5. Reba Cash

तसेच खालील ४ अ‍ॅप्स लोन/लेंडिंग अ‍ॅप नसूनही संभाव्य फसवणूक करणारे असल्यामुळे गुगलने बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे:

1. KeeCredit: Financial Assistance

2. SC Elite Vip

3. LumainMax

4. Exconversion

या अ‍ॅप्सचा वापर टाळावा आणि अशा प्रकारांची माहिती सायबर पोलिसांना तात्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना सूचना:

कोणत्याही लोन अ‍ॅपवर अर्ज करताना काळजी घ्या. अधिकृत रजिस्टर केलेले आर.बी.आय. मंजूर अ‍ॅप्सच वापरावेत. अनधिकृत अ‍ॅप्समुळे आर्थिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Google search engine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here