Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीअतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छतागृहातच दिले स्वच्छतेचे धडे

अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छतागृहातच दिले स्वच्छतेचे धडे

७ नोव्हेंबर
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पात्र ठरण्यासाठी पालिकेला ‘शहर हागणदारीमुक्त’ (ओडीएफ प्लस किंवा ओडीएफ प्लस-प्लस) असा दर्जा मिळविण्याचे बंधन आहे. यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पालिकेला हा दर्जा प्राप्त करण्यात अपयश आल्याने पुन्हा केंद्राकडे अर्ज करण्यात आला आहे. त्याची तपासणी पुढील काही दिवसांत होणार असल्याने तत्पूर्वी शहरातील २३ टक्के स्वच्छतागृहे ‘सर्वोत्तम’ बनविण्याचा खटाटोप पालिकेला करावा लागणार आहे. त्याचे निकष काय आहेत, याची माहिती सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी स्वारगेट येथील ‘सर्वोत्तम स्वच्छतागृहा ‘मध्येच सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
‘स्वच्छ सर्वेक्षणा’त चांगले गुणांकन प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची महापालिकेच्या ‘स्वच्छतागृहा’तच हजेरी घेऊन तेथील अस्वच्छता दूर करण्याचे धडे दिले. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेमध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी दिला.
पालिकेच्या हद्दीतील अशा ‘सर्वोत्तम स्वच्छतागृहां’मध्ये नागरिकांना ५३ प्रकारच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. या सुविधांची पूर्तता कशी करायची याचा वस्तुपाठ गोयल यांनी सर्व अधिकाऱ्यांना घालून दिला. पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त या वेळी उपस्थित होते.
‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत पालिकेच्या ‘ओडीएफ’ दर्जाची तपासणी करण्यासाठी केंद्राचे पथक पुढील काही दिवसांत पुन्हा शहरात येणार आहे. त्यापूर्वी, शहरातील बाराशे स्वच्छतागृहांपैकी तीनशे दहा स्वच्छतागृहांमध्ये निकषांनुसार सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांनी भरली. तसेच, पालिकेला ‘ओडीएफ’ दर्जा मिळण्यात अपयश आल्यास संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा दमही त्यांनी भरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments