१८ ऑक्टोबर २०१९
पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. १७) लिंक रोड ते रमाबाईनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. पोलिसांच्या कोणत्याही परवानगीशिवाय हि पदयात्रा काढली होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे विनापरवाना पदयात्रा काढल्याप्रकरणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि माजी महापौर जगन्नाथ साबळे यांच्यावर पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू शिवाजी पांढरे (वय ४६) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अण्णा बनसोडेंची विना परवाना पदयात्रा – आचारसहिंता भंगाचा गुन्हा दाखल
RELATED ARTICLES