२२ ऑक्टोबर २०१९
‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजीची भूमिका साकारत आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर सैफ अली खान हा राजपूत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. संजय जाधव यांच्या ‘लकी’ या सिनेमामध्ये व्हिलनची भूमिका निभावणारा अभिनेता अजय धैर्यशीलने आता मराठी सिनेमानंतर बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. अजय देवगणच्या ‘तानाजी’ या सिनेमात धैर्यशील तानाजीच्या सैन्यातल्या मावळाच्या भूमिका साकारणार आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगण दिसणार ‘तानाजी’ या मराठमोळ्या भूमिकेत
RELATED ARTICLES